पश्चिम उपनगरांत बुधवारी काही ठिकाणी पाणी बंद - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 3, 2021

पश्चिम उपनगरांत बुधवारी काही ठिकाणी पाणी बंद

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे के/पूर्व विभागात, जोगेश्वरी (पूर्व) येथे महाकाली गुंफा मार्गावर नंदभवन इंडस्ट्रीजजवळ वर्सोवा आऊटलेट या जलवाहिनीवर दुरुस्तीचे काम बुधवारी, ६ ऑक्टोबरला सकाळी १०पासून ७ ऑक्टोबरला सकाळी १० पर्यंत के ले जाणार आहे. या कालावधीत के/पूर्व आणि के/पश्चिम विभागांमधील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

व्ही. पी. मार्ग, जुहू गल्ली, उपासना गल्ली, स्टेशन मार्ग या ठिकाणी पहाटे ३.३० ते सकाळी ८.३० पर्यंत आणि गिल्बर्ट हील येथे सकाळी ८.३० ते ११.१५ वाजेपर्यंत पाणी पुरवठा खंडित राहील. या दिवशी सकाळी ६.३० ते ९ या वेळेत एच पश्चिम विभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. जुहू कोळीवाडय़ात सकाळी १० ते दुपारी १२.१५, चार बंगला येथे दुपारी १२.१५ ते २.१०, मोरागाव आणि पार्ला सप्लाय येथे दुपारी २.२३ ते ४.५५ या वेळेत कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. पार्ला आऊटलेट येथे दुपारी ४.३० ते संध्याकाळी ७.५०, एन. एस. फडके  मार्ग, पूर्ण विलेपार्ले पूर्व भाग येथे संध्याकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत पाणीपुरवठा खंडित राहील. रिलायन्स मोगरा, जुना नागरदास मार्ग, नवीन नागरदास मार्ग, मोगरापाडा रात्री ८ ते १०.३० या वेळेत कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

The post पश्चिम उपनगरांत बुधवारी काही ठिकाणी पाणी बंद appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/2YpI5eh
via

No comments:

Post Bottom Ad

Pages