संप तीव्र करण्याचा निवासी डॉक्टरांचा इशारा - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 3, 2021

संप तीव्र करण्याचा निवासी डॉक्टरांचा इशारा

मुंबई: निवासी डॉक्टरांच्या शैक्षणिक शुल्क माफीवर तोडगा न काढल्यास संप तीव्र करण्याच इशारा मार्डने राज्य सरकारला दिला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी सर्व शासकीय महाविद्यालयात मेणबत्ती मोर्चा काढत डॉक्टरांनी राज्य सरकारच्या धोरणाविरोधात निषेध नोंदविला.

साथीच्या काळात सर्व निवासी डम्ॉक्टर करोना रुग्णांच्या सेवेत लागल्यामुळे पदव्युत्तरचे शिक्षण मिळालेले नाही. या काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी पूर्ण करण्याबाबत आश्वासन देऊनही राज्य सरकारने ठोस कार्यवाही न केल्यामुळे मार्डने चार दिवसांपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. रविवारीदेखील मार्डच्या मागणीवर वैद्यकीय शिक्षण विभागासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघालेला नाही. सोमवारी दुपारपर्यतही काही तोडगा न निघाल्यास संप  तीव्र केला जाईल असे मार्डने जाहीर केले आहे. आत्तापर्यत संप सुरू असूनही रुग्णसेवेवर फारसा परिणाम होऊ नये यासाठी आपत्कालीन आणि अतिदक्षता विभाग, लसीकरण केंद्र, करोना विभाग येथील सेवा निवासी डॉक्टरांनी सुरूच ठेवल्या होत्या. परंतु राज्य सरकारने वेळीच लक्ष न दिल्यास अतिदक्षता विभाग आणि करोना अतिदक्षता विभाग येथील सेवा वगळता सर्व सेवा बंद राहतील असा इशाराही मार्डने दिला आहे. सोमवारी दुपारपासून बाह्य़रुग्ण विभाग, विभागीय वॉर्ड, आपत्कालीन विभाग, अत्यावश्यक शस्त्रक्रिया, प्रसूतीगृह, सर्व लसीकरण केंद्र येथील सेवा बंद केल्या जातील. रुग्णसेवा विस्कळीत झाल्यास याला राज्य सरकार जबाबदारी राहील असेही मार्डने स्पष्ट केले आहे.

The post संप तीव्र करण्याचा निवासी डॉक्टरांचा इशारा appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3iurKf7
via

No comments:

Post Bottom Ad

Pages