रिपब्लिकन पक्षाची भाजपशी युती - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 4, 2021

रिपब्लिकन पक्षाची भाजपशी युती

मुंबई : राज्यातील आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. महापालिका, नगरपालिकांमध्ये तीन सदस्य प्रभाग पद्धती नको, तर एक सदस्यीय प्रभाग पद्धती असावी, अशी मागणीही पक्षाने केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी लोणावळा येथे पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपबरोबर युती करण्याच्या ठरावाचा समावेश आहे. भाजपने पक्षाला योग्य जागा द्याव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

The post रिपब्लिकन पक्षाची भाजपशी युती appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3oFkrFg
via

No comments:

Post Bottom Ad

Pages