घटस्थापनेपासून ‘लोकसत्ता दुर्गां पुरस्कार’ विजेत्यांच्या कर्तृत्वाचा जागर - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 4, 2021

घटस्थापनेपासून ‘लोकसत्ता दुर्गां पुरस्कार’ विजेत्यांच्या कर्तृत्वाचा जागर

मुंबई : अनेकदा बाह्य प्रतिकू लतेला, तर काही वेळा अंतर्गत द्वंद्वाला पुरून उरलेल्या, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतलेल्या आणि आपल्याबरोबर इतरही स्त्रियांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी झटणाऱ्या ९  ‘दुर्गां’ चा जागर यंदाही घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत म्हणजेच ७ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ‘लोकसत्ता’तून के ला जाणार आहे. ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’साठी राज्यभरातून मागवण्यात आलेल्या प्रस्तावांमधून विजेत्या ठरलेल्या नऊ प्रेरणादायी स्त्रियांची माहिती नवरात्रीचे नऊ दिवस दररोज वाचायला मिळणार आहे.   

या पुरस्कारांसाठी आपल्या परिचयातील ‘दुर्गां’ची माहिती पाठवण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक स्त्रियांनी स्वत:ची माहिती पाठवत किं वा आपल्या परिचयातील यशस्विनींची ओळख करून देत ‘लोकसत्ता’कडे प्रस्ताव पाठवले. ४५० हून अधिक संख्येने आलेले हे सर्वच प्रस्ताव म्हणजे आपापल्या स्तरावर संघर्ष करत प्राप्त के लेल्या संचिताची उदाहरणेच होती. या प्रस्तावांमधून विविध निकषांच्या आधारे दोन चाळण्यांनंतर झालेल्या अंतिम निवडीसाठी राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां प्रीती पाटकर आणि कवयित्री-कथाकार नीरजा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. के वळ थेट सामाजिक कार्यच नव्हे, तर कला, क्रीडा, संशोधन, पर्यावरण अशा आपण निवडलेल्या विविध क्षेत्रांत विधायक कामे हाती घेऊन प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ‘दुर्गां’चा विजेत्यांमध्ये समावेश आहे. 

परीक्षकांपैकी ‘आयएएस’ मनीषा म्हैसकर कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्ञात आहेत. प्रीती पाटकर गेली ३४ वर्षे वेश्या व्यवसायातील स्त्रियांच्या मुलांसाठी काम करत आहेत. तर नीरजा या प्रखर स्त्रीवादी कवयित्री व लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. 

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’साठी भरभरून प्रस्ताव पाठवणाऱ्यांचे आभार तसेच विजेत्यांचे अभिनंदन.

The post घटस्थापनेपासून ‘लोकसत्ता दुर्गां पुरस्कार’ विजेत्यांच्या कर्तृत्वाचा जागर appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3FhGwji
via

No comments:

Post Bottom Ad

Pages