विद्यार्थ्यांना तिकीट, पास देण्यासाठी रेल्वेचे राज्य सरकाला पत्र
मुंबई : राज्य शासनाने करोना नियमावलींचे पालन करण्याची सूचना करीत ४ ऑक्टोबरपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले. परंतु दोन लसमात्रांच्या नियमामुळे विद्यार्थ्यांना अद्याप लोकल प्रवासाची परवानगी मिळालेली नाही. परिणामी, खासगी किं वा पालिकांच्या परिवहन सेवांचा वापर करण्याशिवाय विद्यार्थ्यांसमोर पर्याय राहिलेला नाही. विद्यार्थ्यांची अडचण पाहता लोकल प्रवासासाठी त्यांना तिकीट, पास देण्यात यावा आणि त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची मागणी मध्य रेल्वेने राज्य सरकारकडे के ली आहे. त्यावर अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.
अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच दोन लसमात्रा घेतलेल्यांनाही लोकल प्रवासाची १५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत पश्चिम रेल्वेवर चार लाख ४३ हजार ८५४, तर मध्य रेल्वेवर १० लाख २२ हजारांवर प्रवासी संख्या पोहोचली आहे. मात्र राज्य सरकारने १८ वर्षांखालील मुलांच्या लोकल प्रवासाबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यांचे लसीकरणही नसल्याने लोकल प्रवास करणार कसा असा प्रश्न त्यांना व पालकांनाही पडला आहे. त्यामुळे लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवास करायचा कसा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे त्यांना खासगी वाहन किं वा पालिका परिवहन सेवेशिवाय पर्याय नाही. सध्या रस्ते प्रवास करताना वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी पालकांबरोबर रेल्वे स्थानकात येऊन तिकीट खिडक्यांवर तिकीट व पासाची विचारणाही करीत आहेत.
यासंदर्भात मध्य रेल्वेने राज्य सरकारला ४ ऑक्टोबरला पत्र पाठविले आहे. यात विद्यार्थ्यांना तिकीट व पास देण्यासाठी काही मागदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची मागणी या पत्रातून के ल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर पश्चिम रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही सांगितले की, मध्य रेल्वेने पत्र पाठविल्याने त्याच्याच उत्तराची प्रतीक्षा करीत आहोत. राज्य सरकारने मध्य रेल्वेला परवानगी दिल्यास आपोआप तो नियम पश्चिम रेल्वेवरही लागू के ला जाणार आहे. दोन लसमात्रा न झालेल्यांमध्ये शिक्षकांचाही समावेश असून त्यांच्याही प्रवासाची अडचण होत आहे.
रेल यात्री परिषदेचीही मागणी विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासाबाबत अद्याप निर्णय न घेतल्याने रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांनी राज्य सरकारवर टीका के ली आहे. उपनगरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या शहरी भागातील महाविद्यालयात जाण्यासाठी लोकलचा पर्याय उपयुक्त आहे. शाळा व महाविद्यालये सुरू करताना त्यांच्या लोकल प्रवासाचाही विचार होणे गरजेचे आहे. याबाबतही मागणी के ल्याचे गुप्ता यांनी सांगितले
The post शाळा सुरू, रेल्वे प्रवासावर निर्बंध कायम appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3abEanC
via
No comments:
Post a Comment