मुंबई : पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅरामेडिकल अभ्यासक्रमांबाबत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. सध्या राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १३ पॅरामेडिकल अभ्यासक्रम असून साधारण २००० जागा आहेत. ‘या पदवीधारक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच अधिकाधिक मनुष्यबळ शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
भविष्यात १३ अभ्यासक्रमांमधील कोणत्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे याबाबतचा अभ्यास करून, त्यांची पुनर्रचना वैद्यकीय शिक्षण संचालक यांनी करावी. अभ्यासक्रम पाठ्यक्रमामध्ये आवश्यक बदलाच्या दृष्टीने समिती गठीत करून त्याची पुर्नरचना करण्यात यावी,’ असे निर्देश देशमुख यांनी दिले.
The post ‘पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा समावेश सेवा प्रवेश नियमांमध्ये करावा’ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3B9X22s
via
No comments:
Post a Comment