निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 4, 2021

निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे

मुंबई : राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मार्ड’ प्रतिनिधींबरोबर सोमवारी झालेल्या बैठकीत दिली. त्यामुळे अखेर ‘मार्ड’ने सोमवारी संप मागे घेतल्याचे जाहीर केले.

शैक्षणिक शुल्क माफीची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही कार्यवाही न केल्यामुळे संतप्त झालेले राज्यभरातील निवासी डॉक्टर १ ऑक्टोबरपासून संपावर गेले होते. मागील तीन दिवस चर्चा होऊनही तोडगा न निघाल्यामुळे अखेर रविवारी मार्डने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करून संप तीव्र करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मार्ड प्रतिनिधींना सोमवारी बैठकीसाठी बोलावले होते.

राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या कार्याचा सन्मान म्हणून सन्माननिधी देण्यात येईल. शैक्षणिक शुल्क माफी तांत्रिक कारणामुळे शक्य नसल्यामुळे तज्ज्ञासोबत चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले.

मुंबई पालिकेच्या निवासी डॉक्टरांच्या टीडीएस माफीबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात आवश्यक सुधारणा करण्यात येईल, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर अखेर ‘मार्ड’ने संप मागे घेत असल्याचे सोमवारी रात्री जाहीर केले.

The post निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3FkDbjg
via

No comments:

Post Bottom Ad

Pages