मुंबई : राज्यात दिवसभरात २४८६ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली तर ४४ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २४४६ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ३३ हजार आहे.
गेल्या २४ तासांत रायगड ७३, पनवेल ६८, नाशिक ३८, नाशिक शहर २१, अहमदनगर ३४०, पुणे जिल्हा २६४, पुणे शहर १३५, पिंपरी-चिंचवड १११, सोलापूर १६२, सातारा १०२, सांगली ५३, सिंधुदुर्ग ४१, रत्नागिरी ४१, उस्मानाबाद ४१, बीड ३५ नवीन रुग्णांची नोंद झाली.
ठाणे जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यात शनिवारी २५८ करोना रुग्ण आढळून आले. तर दोन जणांचा मृत्यू झाला. ठाणे ६७, कल्याण-डोंबिवली ६५, नवी मुंबई ५२, मिरा भाईंदर ४४, ठाणे ग्रामीण १३, उल्हासनगर नऊ, अंबरनाथ चार बदलापूर तीन आणि भिवंडीतील एका रुग्णाचा सामावेश आहे.
The post राज्यात २,४८६ नवे करोना रुग्ण appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2Yw8MOc
via
No comments:
Post a Comment