मुंबई : अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणारी टोळी करोनामुळे लागलेल्या टाळेबंदीच्या काळात अधिक सक्रिय झाल्याचे पोलिसांनी या काळात केलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे. या वर्षांत तर आधीच्या वर्षाच्या तुलनेत अमली पदार्थांचा तिपटीहून अधिक साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने २०१९ मध्ये केलेल्या कारवाईत वर्षभरात ५१४ गुन्हे दाखल करण्यात आले. यात ७१६ किलोंचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तर ५९५ आरोपींना अटक करण्यात आली.
टाळेबंदीच्या वर्षात (२०२०) ४१४ गुन्ह्यांमध्ये १,०२३ किलो साठा पोलिसांनी ताब्यात घेतला. तर २०२१ मध्ये यात तिपटीहून अधिक वाढ झाली. चालू वर्षात अवघ्या दहा महिन्यात ४४३ कारवाईत ३,८३५ किलोंचा अमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या तिन्ही वर्षात सुमारे ५०० व्यक्तींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
जिल्हा स्तरावर अमली पदार्थविरोधी कक्ष
शहरांबरोबरच ग्रामीण भागातील तरुणही या व्यसनांच्या आहारी जात आहेत. राज्यातील अमली पदार्थांचे वाढते व्यवहार रोखण्याकरिता गृह विभागाने प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांचे अमली पदार्थविरोधी कक्ष निर्माण करण्याचे ठरविले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नुकतेच असे निर्देश दिले.
The post अमली पदार्थांच्या व्यापारात करोनाकाळात वाढ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mx6si8
via
No comments:
Post a Comment