न्हावाशेवात जप्त केलेले हेरॉईनही अफगाणिस्तानमधील - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 9, 2021

न्हावाशेवात जप्त केलेले हेरॉईनही अफगाणिस्तानमधील

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरातून  १२५ कोटी रुपेय किमतीचे सुमारे २५ किलो हेरॉईन जप्त केले होते, ते अफगाणिस्तानच्या कंधार येथून पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.  हा सर्व व्यवहार हवाला मार्फत करण्यात आला होता.

याप्रकरणी डीआरआयने  हवालासह आर्थिक व्यवहारात सहभागी असलेल्या आणखी दोन व्यक्तींना अटक केली आहे.  यापूर्वी डीआरआयने या प्रकरणी एका व्यावसायिकाला अटक केली होती.

डीआरआयने बुधवारी न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून २५ किलो हेरॉईन जप्त केले आहे. शेंगदाण्याचे तेल असल्याचे भासवून  कंटेनरमधील खोक्यात हे अमली पदार्थ दडविण्यात आले होते. इराणवरून आलेला हा माल मशीद बंदर येथील संदीप ठक्कर या व्यावसायिकाच्या आयात क्रमांकावरून भारतात आणण्यात आला. नवी मुंबईतील जयेश संघवी याला ठक्कर याने त्याचा आयात क्रमांक दिला होता. या मालासाठी त्याला १० हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ठक्कर हा संघवीसोबत गेल्या १० वर्षांपासून व्यवहार करत आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास असल्यामुळे आपण आयात क्रमांक दिल्याचे ठक्कर याने चौकशीत सांगितले. त्या कंटेनरमध्ये अमली पदार्थ असल्याची माहिती नव्हती असेही ठक्कर याने डीआरआयला सांगितले.

ठक्करने दिलेल्या माहितीच्या आधारावर डीआरआयने नवी मुंबईतून संघवीला अटक केली असून त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post न्हावाशेवात जप्त केलेले हेरॉईनही अफगाणिस्तानमधील appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3BsLuYj
via

No comments:

Post Bottom Ad

Pages