राज्यात २,२९४ नवे बाधित - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 10, 2021

राज्यात २,२९४ नवे बाधित

मुंबई : राज्यात दिवसभरात २,२९४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर २८ जणांचा मृत्यू झाला. नगर जिल्ह्यातील रुग्णसंख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही.

राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या ३३,४४९ आहे. त्यांत सर्वाधिक ८,५७३ रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. गेल्या २४ तासांत नगर ३९९, पुणे जिल्हा २५९, पुणे शहर १२८, पिंपरी-चिंचवड ६३, सोलापूर ८५, सातारा ११० रुग्णांची नोंद झाली.

ठाणे जिल्ह्यात रविवारी २१९ करोना रुग्ण आढळून आले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील २१९ करोना रुग्णांपैकी ठाणे ७१, कल्याण-डोंबिवली ४५, नवी मुंबई ३४, मीरा-भाईंदर २५, बदलापूर १६, अंबरनाथ १२, उल्हासनगर आठ, भिवंडी सात आणि ठाणे ग्रामीणमधील एकाचा समावेश आहे.

मुंबईत ४५३ नवे रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

रविवारी मुंबईत करोनाच्या ४५३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून ४५७ रुग्ण बरे झाले आहेत. मागील काही दिवस ४०० ते ५००च्या दरम्यान नवीन रुग्ण आढळत होते, मात्र या आठवड्यात, बुधवारी (६ ऑक्टोबर) रुग्णसंख्येचा आकडा थेट ६२९ वर गेला. जवळपास तीन महिन्यांनंतर रुग्णसंख्येत इतकी मोठी वाढ झाली होती.

The post राज्यात २,२९४ नवे बाधित appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/2X4SOuc
via

No comments:

Post Bottom Ad

Pages