मुंबई : बँक गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) मुंबईतील एका इमारतीवर टाच आणली आहे. दिल्लीतील भूषण पॉवर अँड स्टील कंपनीकडून झालेल्या बँक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने ही कारवाई केली. टाच आणण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत १९० कोटी रुपये असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. वरळीतील सीजे हाऊस येथील रहिवासी इमारतीवर ईडीने टाच आणली आहे. भूषण पॉवर अँड स्टील कंपनीच्या माध्यमातून झालेल्या गैरव्यवहाराचा तपास ईडी करत आहे. त्या प्रकरणात आतापर्यंत चार हजार ४२० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. याप्रकरणी २५ जणांविरोधात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
The post बँक गैरव्यवहाराप्रकरणी इमारतीवर ईडीची टांच appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3FeiplC
via
No comments:
Post a Comment