मुंबई : सारस्वत सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर पहिल्यांदाच अनुसूचित जाती-जमातीसाठी एक आणि महिलांसाठी दोन जागा आरक्षित ठेवण्यात येणार असून लवकरच त्यासाठीची निवडणूकही घेतली जाणार आहे. बँकेतर्फे ही माहिती सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीच्या वेळी देण्यात आली. बँकेच्या १०३ वर्षांच्या इतिहासात पहिल्याच या दोन वर्गांसाठी जागा आरक्षित ठेवून निवडणूक घेण्यात येणार आहे.
सुषमा पगारे यांच्यासह आणखी दोघांनी अॅड. राहुल गायकवाड यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी बँकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली. बँकेच्या उपनियमांनुसार १९ सदस्यांच्या संचालक मंडळासाठी परवनागी देण्यात आली आहे. त्यातील १६ सदस्यांची निवडणूक पार पडली असून उर्वरित तीन पदांपैकी एक जागा अनुसूचित जाती-जमातीसाठी व दोन जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले असून या तीन जागांसाठी लवकर निवडणूक घेण्यात येईल, असे बँकेच्या वतीने वरिष्ठ वकील शेखर नाफडे यांनी न्यायालयाला सांगितले.
सहकारी संस्थांचा कार्यकाळ किती असावा, संचालक मंडळावरील सदस्यांची मर्यादा काय असावी हे निश्चिात करणारी ९७वी घटना दुरुस्ती २०१२ मध्ये करण्यात आली. या घटना दुरुस्तीनुसार संचालक मंडळावर एक जागा अनुसूचित जाती-जमाती, तर दोन जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्याचेही नमूद करण्यात आले होते. या घटना दुरुस्तीच्या वैधतेला गुजरात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. गुजरात उच्च न्यायालयाने ही दुरुस्ती रद्दबातल ठरवली होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या जुलै महिन्यात गुजरात न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला. मात्र त्याच वेळी ९७ वी घटना दुरुस्ती केंदीय पातळीवर असल्याने ती एकापेक्षा अधिक राज्यांत असलेल्या सहकारी बँकांसाठी लागू राहील, असे स्पष्ट केले होते.
The post सारस्वत बँके च्या संचालक मंडळावर अनुसूचित जाती-जमाती, महिलांसाठी आरक्षण appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3A55tL9
via
No comments:
Post a Comment