‘महात्मा गांधी यांची ग्रामविकासाची शिकवण आजही मार्गदर्शक’ - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 2, 2021

‘महात्मा गांधी यांची ग्रामविकासाची शिकवण आजही मार्गदर्शक’

मुंबई  :  महात्मा गांधी यांचा जीवनमार्ग हाच एक संदेश आहे. स्वावलंबन, श्रमप्रतीष्ठा, स्वच्छता आणि ग्रामविकासाबाबतची त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी के ले.

महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी महात्मा गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन के ले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन के ले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यचळवळीत देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकजूट केले. सत्य, अहिंसा व सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधींनी सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यात एका छताखाली आणले. त्यांच्या एका हाकेवर देश एकत्र होत असे. त्यांनी बलाढ्य अशा ब्रिटिश सत्तेला अहिंसेच्या मार्गाने देश सोडायला लावला. गांधी विचाराने देशाला नाहीतर जगाला दिशा दिली. पण ज्या विचाराने महात्मा गांधी यांची हत्या केली तेच लोक आज गांधी जयंतीनिमित्त गांधी विचार सामान्यापर्यंत पोहचवत आहेत, हीच गांधी नावाची ताकद आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी के ले. प्रदेश काँग्रेस मुख्यालयात झालेल्या कार्यक्र मात पटोले यांनी गांधी व शास्त्री यांना अभिवादन के ले.

भाजपकडून अभिवादन

प्रदेश भाजपच्या वतीने राज्यभर गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त स्वच्छता अभियान, पदयात्रा, खादीचा प्रसार असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, राष्ट्रीय सचिव विनोद तावडे,  खा. प्रकाश जावडेकर , आ. आशीष शेलार, प्रदेश सरचिटणीस आ. अतुल सावे आदी राज्यात झालेल्या वेगवेगळया उपक्रमांत सहभागी झाले होते.

The post ‘महात्मा गांधी यांची ग्रामविकासाची शिकवण आजही मार्गदर्शक’ appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mmag5J
via

No comments:

Post Bottom Ad

Pages