राज्यभरातील ‘दुर्गां’चा शोध पूर्ण! - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 2, 2021

राज्यभरातील ‘दुर्गां’चा शोध पूर्ण!

मनीषा म्हैसकर, नीरजा आणि प्रीती पाटकर यांच्याकडून निवड

मुंबई: ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’ साठी राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेल्या प्रस्तावांमधून विविध क्षेत्रांमधील नऊ कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी स्त्रियांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या अंतिम निवडीसाठी राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या प्रीती पाटकर आणि कवयित्री-कथाकार नीरजा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

खडतर परिस्थितीचा सामना करत कर्तृत्व गाजवलेल्या आणि विधायक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या स्त्रियांची माहिती या पुरस्कारासाठी पाठवण्याचे आवाहन ‘लोकसत्ता’कडून करण्यात आले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अगदी वैयक्तिक स्तरावर प्रतिकू ल स्थितीतून उभ्या राहणाऱ्या आणि त्यातही सामाजिक कार्यास सुरुवात के लेल्या स्त्रियांपासून एखाद्या क्षेत्रात अनेक वर्षे आत्मसमर्पणाने कार्यरत असलेल्या पुरुषांची मक्ते दारी असणाऱ्या क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या, संशोधन करून नवीन शोध लावणाऱ्या स्त्रियांचेही प्रस्ताव यात होते.  

परीक्षकांपैकी मनीषा म्हैसकर कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्ञात आहेत. त्या १९९२ च्या बॅचच्या ‘आयएएस’ असून सध्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव आहेत. त्यांनी आधी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक म्हणूनही काम पाहिले आहे. वर्धा व सांगली जिल्ह्यांत अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी पदांची जबाबदारी म्हैसकर यांनी बजावली आहे.

 प्रीती पाटकर गेली ३४ वर्षे वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांसाठी काम करत आहेत. ‘प्रेरणा’ या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ‘लालबत्ती’ भागात सुरू करण्यात आलेले या स्त्रियांच्या मुलांसाठीचे रात्रीचे पाळणाघर ही वैशिष्टयपूर्ण संकल्पना ठरली. या स्त्रियांच्या अठरा वर्षांखालील मुलांसाठी ‘डे अँड नाइट केअर सेंटर’, आरोग्य सुविधा निवारा केंद्र, किमान शिक्षणाचा व्यापक व यशस्वी कार्यक्रम त्यांनी राबवला. तसेच या व्यवसायाच्या कचाट्यातून बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुली व तरुण स्त्रियांच्या आयुष्यात स्थिरता येण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत आहेत.

नीरजा या प्रखर स्त्रीवादी कवयित्री व लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे ‘वेणा’, ‘निरन्वय’, ‘स्त्रीगणेशा’, ‘निरर्थकाचे पक्षी’, ‘मी माझ्या थारोळ्यात’ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत, तर ‘जे दर्पणी बिंबले’, ‘ओल हरवलेली माती’, ‘पावसात सूर्य शोधणारी माणसं’, ‘अस्वस्थ मी अशांत मी’ या कथासंग्रहांसह ललित लेखसंग्रह देखील प्रकाशित आहेत.

पुढील आठवड्यापासून…

अंतिम निवड झालेल्यांपैकी  एका दुर्गेची माहिती घटस्थापनेपासून (७ ऑक्टोबर) दसऱ्यापर्यंत (१५ ऑक्टोबर) ‘लोकसत्ता’मध्ये वाचायला मिळणार आहे.   

कठोर निकषांवर…

 सर्वच प्रेरणादायी स्त्रियांमधून दोन चाळण्यांनंतर कठोर निकषांच्या आधारे नऊ ‘दुर्गां’ची निवड करण्याचे अवघड काम परीक्षक मंडळाने बजावले. ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’साठी भरभरून प्रस्ताव पाठवणाऱ्यांचे आभार, तसेच विजेत्यांचे अभिनंदन.

मुख्य प्रायोजक         :        ग्रॅव्हीटस फाऊंडेशन

सह प्रायोजक  :        महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सनटेक रिअल्टी लि.

पॉवर्ड बाय     :        प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे, राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.

The post राज्यभरातील ‘दुर्गां’चा शोध पूर्ण! appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3FeDfBp
via

No comments:

Post Bottom Ad

Pages