‘परब यांच्याविरोधात कदम यांनीच सोमय्यांना माहिती पुरविली’ - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 2, 2021

‘परब यांच्याविरोधात कदम यांनीच सोमय्यांना माहिती पुरविली’

ध्वनिफीत आणि आरोपांमुळे शिवसेनेनेत खळबळ

रत्नागिरी  : रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. या आरोपांच्या पुष्टीसाठी कदम आणि सोमय्या यांच्यातील दूरभाष संवादाची ध्वनिफीतही ऐकवली.

 अनिल परब यांचे बांद्रा येथील कार्यालय तोडले जावे म्हणून त्यांनी केलेला आटापिटाही या ध्वनिफितीत ऐकायला मिळतो. माहिती अधिकार कार्यकर्ता प्रसाद कर्वे यांचाही या ध्वनिफितीत सहभाग असून अनिल परब यांनी उद्धव ठाकरे यांना सांगून मला मंत्रिमंडळात घेण्यापासून रोखले आहे, असे कदम यांचे प्रसाद कर्वे यांच्यासोबतचे कथित संभाषण या वेळी ऐकवण्यात आले.

दापोली तालुक्यातील मुरुड येथे परब यांनी केलेले बांधकाम बेकायदेशीर असल्याचा दावा सोमय्या यांनी यापूर्वीच केला असून ते तोडण्यासाठी कायदेशीर कारवाईचा पाठपुरावा करत आहेत.

पुरावा म्हणून मोबाईलवरील संभाषणाच्या एकूण दहा ध्ननिफीती पत्रकार परिषदेत सादर करत, आमच्या महाविकास आघाडीत काही सूर्याजी पिसाळ तयार झालेत, असाही आरोप संजय कदम यांनी केला.

परब अडचणीत कसे येतील, यासाठी त्यांनी केलेले हे प्रयत्न  भयंकर आहेत. या प्रकरणात त्यांनी स्वत:चा भाऊ सदानंद कदम यांचे नाव कसे अडकवता येईल याचाही पुरेपूर प्रयत्न केल्याचे दिसते. प्रसाद कर्वे यांच्या मदतीने रामदास कदम यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवायची आणि त्रास द्यायचा, असेच काम आतापर्यंत केले आहे, असा आरोप वैभव खेडेकर यांनी के ला.

माझ्याविरुद्ध कारस्थान – रामदास कदम

माझ्या मंत्रीपदाच्या काळात कोकणातील पर्यटन उद्योग वाढावा यासाठी सीआरझेडमध्ये शिथिलता मिळवण्यासाठी मी प्रयत्न केला होता. दापोली तालुकाच नव्हे तर संपूर्ण कोकण किनारपट्टीत स्थानिकांना पर्यटनाद्वारे रोजगार मिळवुन देण्यासाठी सदैव कार्यरत राहणार आहे. मंत्री अनिल परब यांच्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याबाबत बोलणे उचित नाही. पण येणा-या निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्यासाठी हे रचलेले कारस्थान आहे, असा खुलासा रामदास कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

The post ‘परब यांच्याविरोधात कदम यांनीच सोमय्यांना माहिती पुरविली’ appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/2ZSDGB9
via

No comments:

Post Bottom Ad

Pages