सागरी किनारा मार्गाच्या कामात १६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 2, 2021

सागरी किनारा मार्गाच्या कामात १६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार

आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई : महापालिकेकडून उभारल्या जात असलेल्या सागरी किनारा मार्गाच्या ( कोस्टल रोड)  कामात सुमारे एक हजार ६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप भाजप आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. त्याची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची आणि सल्लागार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय पर्यावरण खात्याने परवानगी देताना घातलेल्या अटींचे पालन न केल्याने महापालिकेकडून स्पष्टीकरण मागविण्याची विनंती शेलार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे. कामाचा दर्जा निष्कृष्ट असल्याने या प्रकल्पाचे भवितव्यच धोक्यात आले आहे, असे शेलार यांनी म्हटले आहे.

आरोप पालिके ने फेटाळले

मुंबई सागरी किनारा रस्ता कामांमध्ये १ हजार ६०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप पालिका प्रशासनाने फे टाळले आहेत. भरावासाठी वापरण्यात येणारे साहित्य हे प्रमाणित खाणींमधूनच घेतले जाते. तसेच या साहित्याची वेळोवेळी गुणवत्ता चाचणी केली जाते. त्यामुळे हे साहित्य अप्रमाणित असल्याचा आरोप चुकीचा असल्याचा दावा पालिका प्रशासनाने के ला आहे.

The post सागरी किनारा मार्गाच्या कामात १६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3iuhC66
via

No comments:

Post Bottom Ad

Pages