१८ वर्षांच्या मुलीस गर्भपातास परवानगी - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 9, 2021

१८ वर्षांच्या मुलीस गर्भपातास परवानगी

मुंबई : कोवळ्या वयात मुलीला अपत्याला जन्म देण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही. तसे करणे तिच्या आयुष्यासाठीच नव्हे, तर तिच्या कुटुंबीयांसाठीही घातक ठरू शकते, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले, तसेच १८ वर्षांच्या अविवाहित मुलीला गर्भपात करण्याची परवानगी दिली.

न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. गर्भात काही दोष नसल्याचे आणि मुलगी कुठल्याही अडचणीविना बाळाला जन्म देऊ शकत असल्याचा अहवाल जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला होता. याचिकाकर्तीला नैराश्य आले असले तरी गर्भधारणेचा तिच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले होते.

न्यायालयाने मात्र या अहवालाऐवजी याचिकाकर्त्यां मुलीने नुकतीच वयाची १८ वर्षे पूर्ण केल्याची, गेल्या वर्षी तिने बारावीची परीक्षा दिल्याची आणि ती अविवाहित असल्याची बाब न्यायालयाने तिला गर्भपाताची परवानगी देताना प्रामुख्याने विचारात घेतली.

The post १८ वर्षांच्या मुलीस गर्भपातास परवानगी appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3lpp2cH
via

No comments:

Post Bottom Ad

Pages