आर्यन खानला जामीन नाहीच - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 8, 2021

आर्यन खानला जामीन नाहीच

मुंबई : क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फेटाळला. आर्यनच्या जामीन अर्जावर महानगरदंडाधिकारी सुनावणी घेऊन निर्णय देऊ शकत नसल्याचे न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळताना नमूद केले. आर्यनबरोबर अरबाज मर्चंट आणि मुनमुन धनेचा या दोघांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

अशा प्रकरणांत जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचा अधिकार महानगरदंडाधिकाऱ्यांना नाही. तर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापन विशेष सत्र न्यायालयाला आहे, असा युक्तिवाद आर्यनच्या जामीन अर्जाला विरोध करताना अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) केला होता. मुख्य महानगरदंडाधिकारी आर. एम. नेरलीकर यांनी एनसीबीचा युक्तिवाद मान्य करत आर्यनला दिलासा देण्यास नकार दिला.

आर्यनला गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर त्याचे वकील सतीश मार्नेंशदे यांनी लगेच आर्यनच्या जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर आर्यनने जामीन अर्ज करण्यावर एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी आक्षेप घेतला. तसेच आर्यनचा जामीन अर्ज गुणवत्तेच्या आधारे ऐकण्याआधी अशा प्रकरणांत महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर जामीन अर्ज केला जाऊ शकतो की नाही याचा निर्णय घेण्याची मागणी केली.

विशेष सत्र न्यायालयाला या प्रकरणी खटला चालवण्याचा आणि जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद एनसीबीने केला. त्यासाठी एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला दिला. तर फौजदारी दंडसंहितेनुसार फाशी वा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांतील आरोपींचा जामीन अर्ज ऐकण्याचा अधिकार हा सत्र व उच्च न्यायालायाला आहे. परंतु तीन वर्षांहून अधिकच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्याची सुनावणी घेण्याचा आणि जामीन अर्ज ऐकण्याचा या न्यायालयालाही अधिकार असल्याचा दावा आर्यनच्या वकिलांनी केला. या प्रकरणी तर आर्यनकडून कोणतेही अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले नसल्याकडेही त्यानी लक्ष वेधले.

अटकेनंतर लगेच भाजप नेत्याच्या नातेवाईकाची सुटका – नवाब मलिक

मुंबई : अमली पदार्थ प्रकरणात १० जाणांना अटक करण्यात आली होती, परंतु त्यापैकी दोघांना काही तासांनंतर लगेच सोडून देण्यात आले, त्यात भाजप नेत्याच्या एका नातेवाईकाचा समावेश होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी (एनसीबी) पथकाच्या अधिकाऱ्यांवर केला.   भाजपचा कोण नेता आहे त्याचे नाव उद्या जाहीर करणार आहे, असे मलिक म्हणाले. 

न्यायालयाकडे मागणी…

मी यापूर्वी कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा केलेला नाही. एका प्रतिष्ठित कुटुंबातून असून माझे आईवडील आणि भावंडे मुंबईतच राहतात. माझ्याकडे भारतीय पारपत्रही आहे. त्यामुळे फरारी होणार नाही, शिवाय पुरावे नष्ट करण्याचा प्रश्नच नाही. या प्रकरणी एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केले असून या सगळ्यांचा विचार करून जामीन देण्याची विनंती आर्यनच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली.

The post आर्यन खानला जामीन नाहीच appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3oHblbi
via

No comments:

Post Bottom Ad

Pages