आरेतील वृक्षतोडीवरून पुन्हा वाद - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 8, 2021

आरेतील वृक्षतोडीवरून पुन्हा वाद

केवळ फांद्या छाटल्या जात असल्याचा एमएमआरसीएलचा दावा

मुंबई : आरेतील मेट्रो कारशेड रद्द होऊनही येथील वृक्षतोडीचा वाद संपलेला नाही. एमएमआरसीएलतर्फे शुक्रवारी पुन्हा एकदा युनिट १९ येथील झाडे तोडली जात असताना स्थानिकांनी एकत्र येऊन त्याला विरोध केला.

मेट्रोची कारशेड रद्द झाली असली तरीही मेट्रो ३ साठी इतर कामे आरे परिसरात सुरूच आहेत. येथून जवळच असलेल्या डोंगरावरील विद्युत केंद्रावरून (टॉवर) आलेली विद्युत वाहिनी खालच्या दिशेला असलेल्या विद्युत केंद्राशी जोडण्यासाठी एमएमआरसीएलतर्फे वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे वृक्षतोडीचा प्रयत्न झाला होता मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे वृक्षतोड थांबविण्यात आली.

पुन्हा एकदा शुक्रवारी एमएमआरसीएलतर्फे वृक्षतोडीचा प्रयत्न करण्यात आला. त्याला पोलिसांचाही पािठबा होता, असे एका स्थानिकाने सांगितले. येथे आंबा, नारळ, इत्यादी आठ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार असल्याची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी विरोध सुरू केला.

तसेच विद्युत वाहिन्या अतिशय कमी उंचीवरून जात असल्याने त्याचा रहिवाशांना धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा एकदा एकत्र येत स्थानिकांनी विरोध केला मात्र असे काहीही घडले नसून एकही झाड तोडले जाणार नाही, असे आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांनी सांगितले.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कुठल्याही प्रकारची वृक्षतोड होत नसून वीज कायद्यान्वये पायलॉन व पारेषण वाहिन्यांच्या स्थलांतरणाकरिता काही झाडांच्या फांद्या छाटणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाकरिता आवश्यक असलेली वृक्ष प्राधिकरणाची परवानगी प्राप्त झालेली आहे. प्रवक्ता, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

The post आरेतील वृक्षतोडीवरून पुन्हा वाद appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3uSFKVf
via

No comments:

Post Bottom Ad

Pages