राज्यातील युवक-युवतींना ‘शरद पवार पाठ्यवृत्ती’ - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 8, 2021

राज्यातील युवक-युवतींना ‘शरद पवार पाठ्यवृत्ती’

यंदा कृषी, साहित्य, शिक्षण क्षेत्रातील ११० जणांना संधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १२ डिसेंबरला ८१ व्या वर्षात पदार्पण करणार असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून  शरद पवार प्रेरणा पाठ्यवृत्ती (शरद पवार इनस्पायर फेलोशिप) दिली जाणार असल्याची घोषणा प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकार परिषदेत केली. या वर्षी कृषी, साहित्य व शिक्षण या विषयांत एकू ण ११० फेलोशिप देण्यात येणार असून अर्ज करण्याची मुदत १५ नोव्हेंबर आहे.

शरद पवार यांनी ६० वर्षांहून अधिक काळ देशातील सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक कल्याण, शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत योगदान दिले.  त्यामुळे त्यांच्या आवडीच्या विषयांत नवीन काम आणि माणसे उभी राहावीत या हेतूने यावर्षीपासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने शरद पवार प्रेरणा पाठ्यवृत्ती (शरद पवार इनस्पायर फेलोशिप) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे  या पाठ्यवृत्ती सल्लागार समितीचे अध्यक्ष असतील, असे सुळे यांनी सांगितले. यावेळी डॉ. अनिल काकोडकर, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, विश्वास्त बी. के. अग्रवाल, शरद पवार इनस्पायर लिटररी फेलोशिपचे मुख्य समन्वयक प्रा. नितीन शिंदे, शरद पवार इनस्पायर अ‍ॅग्रीकल्चरचे मुख्य समन्वयक डॉ. निलेश नलावडे  हे आभासी पद्धतीने उपस्थित होते.

माणसांची घडण

 विविध क्षेत्रांत मनुष्यबळ घडवणे हा या पाठ्यवृत्तीचा उद्देश आहे. विषयाची आवड असण्याबरोबरच त्यात काम करण्याची जिद्द व कष्ट, सराव करण्याची तयारी यातून वेगवेगळ्या क्षेत्रांत माणसे घडवली जातात. शरद पवार प्रेरणा पाठ्यवृत्तीच्या माध्यमातून अशीच  माणसे घडवण्याचे काम होणार आहे, असे अनिल काकोडकर म्हणाले.

१५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत 

यंदा पहिल्या वर्षी कृषी, साहित्य व शिक्षण या क्षेत्रातील कामासाठी २५ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींना पाठ्यवृत्ती दिली जाणार आहे. यापैकी शेती आणि साहित्य क्षेत्रातील पाठ्यवृत्तीसाठी ८ ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात येत असून १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येतील.  निवड झालेल्या तरुण-तरुणींच्या नावांची घोषणा १ डिसेंबरला करण्यात येईल. त्यानंतर १२ डिसेंबरला शरद पवार यांच्या वाढदिवशी निवडलेल्या तरुण-तरुणींना सन्मानपूर्वक पाठ्यवृत्ती दिली जाणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. कृषीसाठी ४० मुले व ४० मुलींना, साहित्यासाठी १० जणांना तर शिक्षणासाठी २० जणांना पाठ्यवृत्ती दिली जाईल. गुगल फॉर्मद्वारे हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

The post राज्यातील युवक-युवतींना ‘शरद पवार पाठ्यवृत्ती’ appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/2YqqRgB
via

No comments:

Post Bottom Ad

Pages