‘लोकसत्ता’च्या ‘भीमसेन’ विशेषांकाचे उद्या प्रकाशन
मुंबई : गानदिग्गज पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या स्वरसिद्धीने जगभरातील लाखो संगीत रसिकांची मने काबीज केली. या महान कलावंताला त्याच्या जन्मशताब्दी वर्षात आदरांजली वाहण्यासाठी ‘भीमसेन’ हा विशेषांक ‘लोकसत्ता’ने तयार केला असून, मंगळवारी (१२ ऑक्टोबर) दूरसंवाद माध्यमांद्वारे होणाऱ्या कार्यक्रमात या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
पं. भीमसेन जोशी यांनी अफाट कष्ट करून संगीत साधना केली. त्यामुळे देशाच्याच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील संगीतप्रेमींना ‘भीमसेनी’ स्वराने मोहिनी घातली. ख्याल, ठुमरी, भक्तिगीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते अशा संगीताच्या सर्व प्रकारांमध्ये त्यांनी आपला खास ठसा उमटवला. तसेच संगीताच्या प्रचारासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले. त्यामुळेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात ‘भीमसेन’ हा खास विशेषांक ‘लोकसत्ता’ने तयार के ला आहे.
‘भीमसेन’ विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ कलावंत, अभ्यासक आणि चिंतक पं. सत्यशील देशपांडे, आपल्या गायनाने भारतभरात ख्याती मिळवलेले पं. उल्हास कशाळकर, आरती अंकलीकर, भीमसेनजींचे शिष्य उपेंद्र भट, आनंद भाटे आणि श्रीनिवास जोशी शब्द स्वरांनी पंडितजींच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. भीमसेनजींचे विविध पैलू उलगडून दाखवतानाच त्यांच्या शैलीचे वेगळेपण दाखवणाऱ्या गायनाने या कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे.
सहभागी होण्यासाठी…
मंगळवारी (ता. १२) हा विशेष कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. सहभागासाठी http://tiny. cc/ Loksatta_ Bhimsen_ 12Oct येथे नोंदणी आवश्यक.
प्रायोजक…
मुख्य प्रायोजक : पिनॅकल ग्रुप
सहप्र्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी),
पुनीत बालन ग्रुप
अंकाचे स्वरूप…
गायन, शैली, स्वभाव अशा
अनेक अंगाने भीमसेनजींच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे लेख या विशेषांकात नामवंत कलावंतांनी लिहिले आहेत.
The post स्वरसम्राटाला शब्दचित्रांतून आदरांजली appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3Bumbop
via
No comments:
Post a Comment