मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना गुन्हे शाखेने नोटीस पाठवून १२ ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. याबाबतची नोटीस परमबीर सिंह यांच्या मुंबईतील घराबाहेरही चिकटवण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल खंडणी प्रकरणात गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
गोरेगावमधील बिमल अग्रवाल या बिल्डराने ९ लाख रुपयांच्या खंडणीचा आरोप करत हा गुन्हा दाखल केला होता. तसेच सचिन वाझेला आत्तापर्यंत एकूण ११ लाख ९२ हजारांचा हप्ता दिल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले होते. परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमिर्त सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून त्याप्रकरणात १२ ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सिंह यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, जानेवारी २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ९ लाख वसुलीचा आरोप तक्रारदाराने केला आहे. बोहो बार अँड रेस्टॉरंटमधून वाझे वसुली करत होते. आत्तापर्यंत वाझेंना ११ लाख ९२ हजारांचा हप्ता दिला आहे, असे बिमल अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत सांगितले आहे.
The post परमबीर सिंह यांना गुन्हे शाखेची नोटीस appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3Dv3bXN
via
No comments:
Post a Comment