दोन एसआरए अधिकाऱ्यांना प्राप्तीकर विभागाचे समन्स ; २२ नोव्हेंबरला चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, November 14, 2021

दोन एसआरए अधिकाऱ्यांना प्राप्तीकर विभागाचे समन्स ; २२ नोव्हेंबरला चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (एसआरए) दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्तीकर विभागाकडून समन्स बजावण्यात आले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना २२ नोव्हेंबरला सिंधिया हाऊस येथे चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश आयकर विभागाने दिले आहेत.

प्राप्तीकर विभागाने ११ नोव्हेंबरला एसआरएतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. शांतीलाल टांक आणि रामा मिटकर अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. प्राप्तीकर विभागाच्या कलम १३१(१अ) अंतर्गत हे समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांना २२ नोव्हेंबरला सिंधिया हाऊस येथे उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २०१६ ते २०२१ दरम्यानच्या स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या उत्पन्नाच्या स्रोतांसंबधीची कागदपत्रे, माहिती तसेच बँकेच्या खात्याची माहिती सादर करावे असेही या समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.

याविषयी शांतीलाल टांक आणि रामा मिटकर यांना विचारले असता त्यांनी अद्याप आपल्याला असे कोणतेही समन्स मिळाले नसल्याचे सांगितले. प्राप्तीकर विभागाने एकाच वेळी रामा मिटकर आणि शांतीलाल टांक यांच्यासह सुदाम परदेशी नावाच्या व्यक्तीलाही १३१(१अ) अंतर्गत समन्स बजावले आहे. मिटकर यांना २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता, परदेशी यांना साडेअकरा वाजता, तर टांक यांना पावणेबारा वाजता हजर राहण्यास सांगितले आहे.

उत्पन्नाच्या स्त्रोतांविषयी संशय

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी शांतीलाल टांक आणि रामा मिटकर यांनी २०१६ ते २०२१ दरम्यान स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या उत्पन्नाच्या स्रोतांसंबधीची कागदपत्रे, माहिती तसेच बँकेच्या खात्याची माहिती सादर करावी, असे प्राप्तीकर खात्याच्या समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.

The post दोन एसआरए अधिकाऱ्यांना प्राप्तीकर विभागाचे समन्स ; २२ नोव्हेंबरला चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3wJu48a
via

No comments:

Post Bottom Ad

Pages