मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, November 14, 2021

मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पाश्र्वभूमीवर एका राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळ आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांही सहभागी झाल्या होत्या. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी जनशक्ती संघटनेशी संलग्न असल्याचा दावा केला आहे. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सरकारविरोधात घोषणाबाजी केली. महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण झालेच पाहिजे, एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा आशयाची घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपायुक्त डॉ. हरी बाजाजी एन यांनी सांगितले.

The post मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3ce0ePw
via

No comments:

Post Bottom Ad

Pages