मुंबई : बोरिवली येथे इमारतीच्या १० मजल्यावरून पडून ११ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. हेतवी मेहता असे या मुलीचे नाव असून याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमागे घातपात नसून अपघात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता बोरिवलीतील शिंपोली रोडच्या एका निवासी इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या १०व्या मजल्यावर हेतवी ही तिच्या आई, वयोवृद्ध आजी-आजोबांसोबत राहत होती. शनिवारी तिची आजी घरात झोपली होती तर तिची आई आणि आजोबा काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरातच हेतवी ही ग्रिलवर बसून अभ्यास करीत होती. दुपारी साडेतीन वाजता ती अचानक दहाव्या मजल्यावरून खाली पडली. हा प्रकार इमारतीच्या एका रहिवाशाच्या लक्षात येताच त्याने बोरिवली पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी हेतवीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.
The post इमारतीवरून पडून ११ वर्षांच्या मुलीचा मृत्यू appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3qCtYy3
via
No comments:
Post a Comment