पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारात राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी ठेवण्यास दिलेले ३३ लाख रुपये नातेवाईकांनी सायबर पोलिसांकडे जमा केले. त्याशिवाय सुपे यांच्याकडून उसने घेतलेले पाच लाख रुपयेही एकाने पोलिसांकडे परत आणून दिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आतापर्यंत पोलिसांनी जप्त केलेली रक्कम तीन कोटी रुपयांहून अधिक झाली आहे.
म्हाडा प्रश्नपत्रिका फुटीचा तपास करताना टीईटी परीक्षा निकालात फेरफार झाल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली. चौकशीत सुपे यांच्याकडून अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त ऐवज जप्त करण्यात आला. त्यानंतर सुपे यांनी पैशाच्या आणखी दोन बॅगा कोणाला तरी दिल्याची माहिती उघडकीस आली होती. ते पैसे परत करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यानुसार सुपे यांच्या नातेवाइकाने त्यांच्याकडे पैशाच्या दिलेल्या दोन बॅगा सायबर पोलिसांकडे आणून दिल्या. बॅगा उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये ३३ लाख रुपये आढळून आले. सुपे यांच्याकडून सायबर पोलिसांनी आतापर्यंत तीन कोटी आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.
The post विधिमंडळ अधिवेशन : तुकाराम सुपेंच्या नातेवाइकांकडून ३३ लाख रुपये जप्त appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3eoxDs4
via
No comments:
Post a Comment