मद्यालयांनाही ५० टक्के उपस्थितीचा नियम ; वेळेचे मात्र बंधन नाही - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 31, 2021

मद्यालयांनाही ५० टक्के उपस्थितीचा नियम ; वेळेचे मात्र बंधन नाही

मुंबई : मुंबईतील नाटय़गृहे, सिनेमागृहे, उपाहारगृहे अशा आस्थापनांना ग्राहक संख्येच्या ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आल्यानंतर मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल व बारनाही हा नियम लागू करण्यात आला आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबत आदेश दिले आहेत. मद्य विक्री करणाऱ्या उपाहारगृहांना वेळेचे बंधन घालण्यात आलेले नसून ग्राहकांच्या उपस्थितीवर मात्र बंधन असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणूच्या प्रसाराबरोबरच एकूणच करोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे राज्य सरकार व मुंबई महापालिका प्रशासन सावध झाले असून विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्य सरकारने २४ डिसेंबर रोजी नवे निर्बंध जाहीर केले होते. त्यावेळी हॉटेल, उपाहारगृहे, व्यायामशाळा, स्पा, नाटय़गृहे, सिनेमागृहे यांमध्ये क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. या अस्थापनांना आपली ग्राहक मर्यादा जाहीर करण्याचेही निर्देश दिले होते. यात आता पालिका प्रशासनाने अधिक सुस्पष्ट आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी मद्य दिले जाते अशी उपाहारगृहे, परमिट रूम, बिअर बार, डिस्कोथेक अशा ठिकाणी वेळेच्या मर्यादेबाबत कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही; मात्र या ठिकाणी देखील ५० टक्के उपस्थितीलाच परवानगी देण्यात आली आहे. करोनापूर्व काळाप्रमाणेच या आस्थापनांच्या वेळा रात्री दीड वाजेपर्यंत असतील.

The post मद्यालयांनाही ५० टक्के उपस्थितीचा नियम ; वेळेचे मात्र बंधन नाही appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mIgspO
via

No comments:

Post Bottom Ad

Pages