नमिता धुरी, लोकसत्ता
मुंबई : दिवसेंदिवस कमी होत चाललेले हरितक्षेत्र, वाढते काँक्रीटीकरण यांचा परिणाम म्हणून मुंबईतील हिवाळाही उष्ण होऊ लागला आहे. १५ अंश सेल्सिअस असे २०२० सालच्या डिसेंबरमधील सर्वात कमी तापमान होते. २०२१ या वर्षांत मात्र १७.४ अंश सेल्सिअस असे डिसेंबरमधील सर्वात कमी तापमान आहे. त्यामुळे २०२१ सालचा हिवाळा २०२० सालच्या तुलनेत २.४ अंशांनी अधिक उष्ण ठरला.
२०२० सालच्या अखेरीस २९ डिसेंबर या दिवशी सर्वाधिक कमी तापमान नोंदवले गेले. यादिवशी सांताक्रूझ येथे १५ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. २०२१ सालच्या २९ डिसेंबरला १७.४ अंश सेल्सिअस असे किमान तापमान सांताक्रूझ येथे नोंदवले गेले. हे या वर्षांतील सर्वात कमी तापमान ठरले. २०२० सालच्या १४ डिसेंबरला मुंबईतील तापमान २२ अंश सेल्सिअस ते २६.९ अंश सेल्सिअस असे होते. १ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईतील तापमान २३.८ ते २४.८ अंश सेल्सिअस दरम्यान होते. येथे २०२१ साली कमाल तापमानात २.१ अंशाची घट झालेली असली तरीही किमान तापमानात १.८ अंशांची वाढ झाली होती.
२०२० या वर्षांच्या अखेरच्या दिवशी १८.५ ते ३४ अंश सेल्सिअस तापमान होते तर २०२१ या वर्षांच्या अखेरच्या दिवशी २१.६ ते ३२. ४ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यानुसार ३१ डिसेंबर या दिवसाच्या कमाल तापमानात १.६ अंशांची घट झाली होती. मात्र त्याच वेळी किमान तापमानात ३.१ अंशांची वाढ झाली होती. त्यामुळे २०२१ हे वर्ष सरले तरीही मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा कायम आहे.
शुक्रवारी सांताक्रूझ येथे २१.६ अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे २२.२ अंश सेल्सिअस असे किमान तापमान नोंदवले गेले. येथे सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे ४ आणि २ अंशांची वाढ झाली होती.
The post २०२१ सालचा डिसेंबर अधिक उष्ण ; किमान तापमानात २.४ अंशांची वाढ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/32xdMok
via
No comments:
Post a Comment