भविष्यातील धोका लक्षात घेता पालिका सतर्क
मुंबई : मुंबईत करोनाबाधित आणि ओमायक्रॉनची बाधा झालेल्यांची संख्या वाढू लागली असल्याने पालिका सतर्क झाली आहे. ओमायक्रॉनचा भविष्यातील धोका लक्षात घेऊन करोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी ४० हजार, तर झोपडपट्टीवासीयांसाठी ३० हजार खाटा सज्ज ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. करोनाशी मुकाबला करण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा कृती आराखडा तयार केला आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याने मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
त्यातच ओमायक्रॉनची बाधा झालेल्यांची संख्याही वाढत आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनची बाधा झालेले रुग्ण सापडत असले तरी त्यांना सौम्य लक्षणे असल्याचे आढळले आहे. त्यामुळे बाधितांसोबतच लक्षणे नसलेल्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिका रुग्णालये, जम्बो करोना केंद्रांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी ४० हजार खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. झोपडपट्टय़ांमध्ये करोनाविषयक नियमांचे पालन करणे परिस्थितीमुळे शक्य होत नाही.
हे लक्षात घेता झोपडपट्टीतील करोनाची बाधा झालेले वा ओमायक्रॉनची सौम्य लक्षणे आढळणाऱ्यांसाठी ३० हजार खाटा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
The post ओमायक्रॉनसाठी कृती आराखडा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3Ej36Gn
via
No comments:
Post a Comment