कामावर परतण्यासाठी दोन दिवसांची मुदत; एसटीचे ६८ हजार कर्मचारी अद्याप संपावर - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 21, 2021

कामावर परतण्यासाठी दोन दिवसांची मुदत; एसटीचे ६८ हजार कर्मचारी अद्याप संपावर

एसटीचे ६८ हजार कर्मचारी अद्याप संपावर

मुंबई: संप मागे घेण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने केल्यावर आणि कारवाई मागे घेण्याचे आश्वासन एसटी महामंडळाने दिल्यानंतरही मंगळवारी ६८ हजार कर्मचारी संपावर होते. कामावर परतण्यासाठी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून अन्यथा पुन्हा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, बुधवारी उच्च न्यायालयात अवमान याचिकेवर सुनावणी होणार आहे.

एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे, या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपाची नोटीस देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने सोमवारी संप मागे घेण्याची घोषणा एसटी महामंडळाशी झालेल्या बैठकीनंतर केली. यावेळी निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्ती अशा कारवाया मागे घेण्यावर चर्चाही झाली. महामंडळाने या कारवाया मागे घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी यासंदर्भात परिपत्रक काढले. नियमबाह्यरीत्या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी २२ डिसेंबरपर्यंत व जे कर्मचारी मराठवाडा, अमरावती, नागपूर प्रदेशात कार्यरत आहेत, अशा कर्मचाऱ्यांनी २३ डिसेंबरपर्यंत कर्तव्यावर हजर व्हावे. दिलेल्या कालमर्यादेत आगारात हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कर्तव्यावर हजर करून घेऊन कामगिरी देण्याचे आदेश कार्यशाळा व्यवस्थापक, विभाग नियंत्रक यांना परिपत्रकातून देण्यात आले आहेत.

आगारातील वाहतुक पूर्ववत सुरू झाल्यानंतर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे आणि ज्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे त्यांच्यावरील कारवाईही मागे घेण्यास सांगितले आहे. संपकाळातील बदली रद्द करतानाच दाखल केलेले गुन्हेही मागे घेण्याचे परिपत्रकातून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, २३ डिसेंबरपर्यंत कर्मचारी हजर होण्याची प्रतीक्षा महामंडळ करणार आहे. त्यानंतर पुन्हा कारवाईला सुरुवात होईल. मात्र यावर अंतिम निर्णय एसटी महामंडळ पुन्हा घेईल.

The post कामावर परतण्यासाठी दोन दिवसांची मुदत; एसटीचे ६८ हजार कर्मचारी अद्याप संपावर appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3pjoMhG
via

No comments:

Post Bottom Ad

Pages