ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण आढळले
मुंबई : करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या लागोपाठ दुसऱ्या दिवशी दीड हजारांच्या आसपास झाली. दिवसभरातच १४८५ नवे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय ओमायक्रॉनच्या दोन नवीन रुग्णांचे निदान झाले.
ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण हे औरंगाबादमध्ये आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ११० झाली. औरंगाबादमध्ये आढळलेले दोन्ही रुग्ण हे पुरूष असून, एकाने दुबईला भेट दिली होती. दुसरा रुग्ण हा आंतरराष्ट्रीय प्रवाशाचा निकटसहवासीत आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ४० रुग्ण हे मुंबईतील आहेत.
उपचाराधीन रुग्णसंख्येत वाढ
मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दिवसभरात मुंबई ७३१, ठाणे जिल्हा २१४, पुणे जिल्हा २६०, मराठवाडा २१, विदर्भ ३४ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील उपचाराधीन रुग्णसंख्या ९,१०२ झाली. गेले काही दिवस ही संख्या सहा हजारांच्या आसपास होती. आता या संख्येत वाढ झाली. दिवसभरात करोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून १ लाख ४१ हजार ४१६ जणांचा मृत्यू झाला आहे
The post राज्यात करोनाचे १४८५ नवे रुग्ण; ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण आढळले appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/32x5DQc
via
No comments:
Post a Comment