प्रत्येक विद्यापीठात मराठी भाषा जतन मंडळ; विद्यापीठ कायद्यात सुधारणा - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 25, 2021

प्रत्येक विद्यापीठात मराठी भाषा जतन मंडळ; विद्यापीठ कायद्यात सुधारणा

विद्यापीठ कायद्यात सुधारणा

मुंबईराज्यातील प्रत्येक विद्यापीठात मराठी भाषा जतन आणि प्रचलन मंडळ आणि समान संधी मंडळ स्थापन करण्यात येणार असून विद्यापीठ कायद्यात याबाबत तरतदू करण्यात आली आहे.

चार वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या महाराष्ट राज्य विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यात येत आहे. त्याबाबतचा मसुदा नुकताच विधानसभेत मांडण्यात आला. सध्या विद्यापीठात कार्यरत असलेल्या मंडळांमध्ये आणखी दोन मंडळांची भर पडणार आहे. मराठी भाषेचे जतन आण प्रसारासाठी मराठी भाषा जतन आणि प्रचलन मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. मराठीचा प्रसार, इतर भाषांतील साहित्य, अभ्यासक्रम यांचा मराठीत अनुवाद करणे अशा जबाबदाऱ्या या मंडळाकडे असतील.

मंडळाची कार्यकक्षा काय  मराठी हे अध्यापनाचे माध्यम म्हणून प्रोत्साहन मिळावे यासाठी उपाय योजना करणे. इतर भाषांतील साहित्य, शोधनिबंध, अहवाल यांचा मराठीत अनुवाद करणे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मराठीतील व्यावसायिक आणि उपयोजित पाठ्यक्रम सुरू करणे, अशी या मंडळाची कार्यकक्षा असेल.

समान संधी मंडळ

सामाजिक दुर्बल घटक, अल्पसंख्याक, महिला, सर्मंलगी व्यक्ती, अपंग व्यक्ती यांना समान संधी मिळावी, न्याय मिळावा यासाठी समान संधी मंडळही स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

The post प्रत्येक विद्यापीठात मराठी भाषा जतन मंडळ; विद्यापीठ कायद्यात सुधारणा appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3qiIfxW
via

No comments:

Post Bottom Ad

Pages