महागाईतही गुंतवणूक कशी कराल?; ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’ उपक्रमातून मंगळवारी मार्गदर्शन - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 18, 2021

महागाईतही गुंतवणूक कशी कराल?; ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’ उपक्रमातून मंगळवारी मार्गदर्शन

‘लोकसत्ता-अर्थसल्ला’ उपक्रमातून मंगळवारी मार्गदर्शन

मुंबई : दैनंदिन वापराच्या चीज-वस्तू, भाजीपाला, खाद्यपदार्थच नाही, तर कपड्यांपासून संगणकापर्यंत अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत आणि आता येत्या काळातही या किमती चढ्याच राहतील, अशी भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कुटुंबाचा आर्थिक ताळेबंद बिघडवणाऱ्या महागाईने उभे केलेल्या कोड्याची उकल ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या उपक्रमातून येत्या मंगळवारी केली जाणार आहे.

क्वांटम म्युच्युअल फंड प्रस्तुत अर्थसाक्षरतेला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मालिकेतील या ताज्या कार्यक्रमात गुंतवणूक नियोजनकार आणि अर्थ अभ्यासक कौस्तुभ जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत. घटत असलेले बँक ठेवींचे व्याज दर, मौल्यवान धातूंमधील दरचकाकी आणि साठ हजारांच्या वर-खाली हेलकावे घेणारा ‘सेन्सेक्स’ अशा गोंधळून टाकणाऱ्या स्थितीत नेमका कोणता गुंतवणूक मार्ग अनुसरावा या प्रश्नाचा ते उलगडा करतील. क्वांटम म्युच्युअल फंडाचे संदीप भोसलेही सध्याच्या अस्थिर बाजार स्थितीत गुंतवणूकदारांनी त्यांच्या वर्तनात करावयाचे बदल कोणते हे स्पष्ट करतील. दूरचित्र-संवाद माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांना त्यांच्या गुंतवणुकांविषयीचे प्रश्न व शंका विचारण्याची संधीही मिळेल.

करोना साथ आणि टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी अर्थव्यवस्था अक्षरश: ठप्प झाली होती. आता सगळे व्यवहार पुन्हा रुळावर येताना दिसत असताना महागाईचे संकट उभे राहिले आहे. बाजारात अस्थिरता आणि आर्थिक आघाडीवर अनिश्चितता असताना गुंतवणुकीचे धाडस करायचे तर कुठे, असा सर्वसामान्यांपुढे पेच आहे. त्यासाठी उपलब्ध पर्यायांविषयी या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक उहापोह करतील. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत्या जबाबदाऱ्यांसह उत्पन्न, खर्च यांचा मेळ राखत आर्थिक नियोजनाची घडी यातून बसवली जाऊ शकते हे सोदाहरण पटवून दिले जाईल.

कधी : मंगळवार, २१ डिसेंबर २०२१, संध्याकाळी ६ वा.

वक्ते : कौस्तुभ जोशी, गुंतवणूक नियोजनकार, अर्थ अभ्यासक

संदीप भोसले, उपाध्यक्ष (ग्राहक-संवाद), क्वांटम म्युच्युअल फंड 

सहभागी कसे व्हाल?

http://tiny.cc/LS_Arthsalla_21Dec या दुव्यावर जाऊन वाचकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक. अथवा वरील क्यूआर कोड स्कॅन करूनही नाव नोंदणी करता येईल.

The post महागाईतही गुंतवणूक कशी कराल?; ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’ उपक्रमातून मंगळवारी मार्गदर्शन appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3e7OEGN
via

No comments:

Post Bottom Ad

Pages