एससी, एसटींचेही आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची टीका - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 18, 2021

एससी, एसटींचेही आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची टीका

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची टीका

गोंदिया : भाजप ओबीसींच्या पाठोपाठ देशातील एससी आणि एसटी बांधवांचेही आरक्षण संपवायला निघाल्याची टीका राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रचारासाठी गोंदियात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाने तेथील प्रक्रिया थांबवली आहे. तिथेही ओबीसींचे आरक्षण रद्द होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात ओबीसींचे आरक्षण न टिकवू शकणारे मुख्यमंत्री शिवरार्जंसह यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यात ओबीसींचे आरक्षणावरून महाविकास आघाड़ीला बदनाम करणाऱ्या आणि आमच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी, करावी अशी टिप्पणी भूजबळ यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रासोबतच मध्यप्रदेश, कर्नाटक व पुढे इतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडचणीत आल्या त्या भाजपच्या लोकामुळेच, असा आरोपही भुजबळ यांनी केला.

The post एससी, एसटींचेही आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची टीका appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3yFma0j
via

No comments:

Post Bottom Ad

Pages