किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची तयारी ; केंद्राच्या नियमावलीची पालिकेला प्रतीक्षा - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 26, 2021

किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची तयारी ; केंद्राच्या नियमावलीची पालिकेला प्रतीक्षा

मुंबई : किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला येत्या ३ जानेवारी रोजी प्रारंभ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर पालिका प्रशासनाने तयारीचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे.

महापालिकेची तयारी आहे, मात्र कोणती लस दिली जाणार, किती साठा मुंबईला मिळेल यावर लसीकरणाचा वेग अवलंबून असेल. त्यासाठी पालिकेला केंद्र सरकारच्या नियमावलीची प्रतीक्षा आहे.

पंतप्रधानांच्या घोषणेच्या अनुषंदाने पालिकेने तयारीचा आढावा घेतला आहे.  नक्की कोणती लस मुलांना द्यायची याबाबतचे आदेश आणि त्याबाबतची नियमावली आल्यानंतर तीन चार दिवसांतच लसीकरणाला प्रारंभ करता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

पालिकेची ४०० केंद्रे असून दिवसाला एक लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. 

किशोरवयीनांच्या लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दयावे लागणार आहे. लहान मुलांना लस दिल्यानंतर त्यांना किती वेळ थांबवावे, त्रास झाल्यास काय करावे अशा सूचनाही त्यातून मिळू शकतील. अनेकदा मुले इंजेक्शनला घाबरतात त्यामुळे त्यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, वॅक्सिन एक्सेप्टर असे उपकरण वापरण्याचाही विचार करण्यात येत आहे. मात्र हे उपकरण कसे वापरायचे याबाबतही नियमावलीची  प्रतीक्षा आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

वर्धक मात्रेसाठी अडीच ते पावणे तीन लाख

आरोग्य सेवेतील व आघाडीवरील कर्मचाऱ्यांना वर्धक लसमात्रा देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे. या गटातील अडीच ते पावणे तीन लाख नागरिक आहेत.

१५ ते १८ वयोगटातील नऊ लाख मुले

मुंबईत १५ ते १८ वयोगटातील नऊ लाख मुले आहेत. ती साधारण अकरावी व बारावी या वर्गातील आहेत. त्यामुळे आम्ही कनिष्ठ महाविद्यालयांची यादी तयार केली आहे. महाविद्यालयांनी परवानगी दिल्यास तेथेच लसीकरण करता येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

The post किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची तयारी ; केंद्राच्या नियमावलीची पालिकेला प्रतीक्षा appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3sAK78j
via

No comments:

Post Bottom Ad

Pages