२ लाख १२ हजार ५७९ स्नातकांना पदव्या, २४३ जणांना पी.एचडी.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचा वार्षिक पदवीदान (दीक्षान्त) समारंभ सोमवारी २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या वर्षीच्या पदवी प्रदान समारंभामध्ये विविध विद्याशाखांतील पदवी आणि पदव्युत्तर मिळून एकूण २ लाख १२ हजार ५७९ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. पदवीसाठी १ लाख ७९ हजार ७०६, तर पदव्युत्तरसाठी ३२ हजार ८७३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये मानव्यविज्ञान शाखेच्या २५ हजार ५९३, आंतरविद्याशाखेच्या १० हजार ९८, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या १ लाख १७ हजार ८३२ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ५९ हजार ५६ पदव्यांचा समावेश आहे. तसेच विविध विद्याशाखेतील २४३ स्नातकांना विद्यावाचस्पती ( पी.एचडी,) तर डॉ. श्रीनिवासन कन्नन यांना संस्कृत विषयात डी.लीट. आणि डॉ. मुकुंद चोरघडे यांना रसायनशास्त्र विषयात डी.एस्सी. पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या १८ विद्यार्थ्यांना १९ पदके प्रदान करण्यात येणार आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे इतर अनेक मान्यवर या सोहळय़ास हजर राहणार आहेत. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या यूटय़ूब चॅनलवर होणार आहे.
The post मुंबई विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ आज appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3enXkZE
via
No comments:
Post a Comment