‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या पूर्तता समारंभाचे आज आयोजन; ज्येष्ठ नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते सहभागी संस्थांना धनादेश वितरण - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 19, 2021

‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या पूर्तता समारंभाचे आज आयोजन; ज्येष्ठ नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते सहभागी संस्थांना धनादेश वितरण

ज्येष्ठ नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते सहभागी संस्थांना धनादेश वितरण

मुंबई : लाखो गरजू रुग्णांवर यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करणारे ज्येष्ठ नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांचे मनोगत ऐकण्याची संधी ‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’च्या दानयज्ञ सोहळ्यात मिळणार आहे. विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांना गणेशोत्सव काळात मदतीचा हात देणाऱ्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाचा पूर्तता समारंभ सोमवार, २० डिसेंबर रोजी माटुंगा पूर्व येथील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या सोहळ्यात डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते सहभागी संस्थांना धनादेश वितरित केले जातील.

समाजातील कमतरतेला हेरून त्यावर मात करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था अहोरात्र मेहनत करीत आहेत. अशा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे करून देण्यात येते. याअंतर्गत वाचकांना आवाहन करून संस्थांसाठी मदतनिधी उभारला जातो. गेल्या १० वर्षांत या उपक्रमांतर्गत १०२ संस्थांची ओळख करून देण्यात आली आहे. यंदाचे हे ११ वे वर्ष असून दिशा एज्युकेशन फाऊंडेशन (अमरावती), स्मित वृद्धालय (ठाणे), रामचंद्र प्रतिष्ठान (दादर), त्वाष्टा कासार समाज सेवा संस्था वाचन मंदिर (पुणे), उगम फाऊंडेशन (सांगली), व्हॉइस ऑफ दी व्हॉइसलेस अभियान (सोलापूर), आपलं घर (उस्मानाबाद), डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट (पालघर), मातृमंदिर (रत्नागिरी), आपलं पर्यावरण संस्था (नाशिक) या दहा संस्थांची ओळख करून देण्यात आली होती.

‘लोकसत्ता’च्या या दानयज्ञाला यंदाही वाचक आणि दानशूरांनी भरभरून प्रतिसाद दिला. ठिकठिकाणांहून आलेले हे धनादेश सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात वितरित करण्यात येणार आहेत. या वेळी संस्थांच्या वाटचालीचा आढावा संबंधित प्रतिनिधी उपस्थितांसमोर मांडतील.

जे. जे. रुग्णालयातील नेत्र चिकित्सा विभागात डॉ. लहाने यांच्या आधिपत्याखाली साडेतीन लाखांहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी १ लाख ६२ हजार शस्त्रक्रिया त्यांनी स्वत: केल्या आहेत. गरजूंच्या उपचारासाठी लहाने यांचा कायम पुढाकार असतो. आजवर त्यांनी केलेले सामाजिक कार्य, सामाजिक कार्याविषयी असलेले त्यांचे मनोगत या कार्यक्रमातून उपस्थितांना ऐकता येईल. समजासाठी अहोरात्र झटणाऱ्या या संस्थांना आर्थिक मदतीतून समृद्धीकडे नेणारा हा सोहळा करोनाचे सर्व नियम पाळून होणार आहे. सरकारी नियमानुसार आसन क्षमतेच्या ५०  टक्के जागा उपलब्ध असतील. कार्यक्रम विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

प्रायोजक

बँकिंग पार्टनर : दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.

The post ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या पूर्तता समारंभाचे आज आयोजन; ज्येष्ठ नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते सहभागी संस्थांना धनादेश वितरण appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mhCLlY
via

No comments:

Post Bottom Ad

Pages