दोन अंकी विकासदराचे कयास; चालू आर्थिक वर्षासंबंधी कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांचा आशावाद - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 20, 2021

दोन अंकी विकासदराचे कयास; चालू आर्थिक वर्षासंबंधी कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांचा आशावाद

चालू आर्थिक वर्षासंबंधी कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांचा आशावाद

मुंबई : नवीन उत्परिवर्तित विषाणूच्या संसर्गाने डोके वर काढले असले तरी २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था दोन अंकी दराने म्हणजे ९ ते १० टक्क्यांनी वाढ साधू शकेल, असा आशावाद व्यक्त करणारा कौल विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयने तिच्या राष्ट्रीय परिषद सदस्यांसह विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये (सीईओ) केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सोमवारी जाहीर केले. बहुतांश म्हणजे सर्वेक्षणात सहभागी ५६ टक्क्यांहून अधिक कंपनीप्रमुखांनी २०२१-२२ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये ९ ते १० टक्क्यांची वाढ दिसू शकेल, असे मत नोंदविले. १० टक्के मुख्याधिकाऱ्यांनी तर अर्थव्यवस्थेत १० टक्क्यांपेक्षा अधिक गतीने वाढीची शक्यता वर्तविली.

सार्वजनिक खर्चात सरकारने केलेली लक्षणीय वाढ, अर्थव्यवस्थेतील तरलतेला पूरक ठरण्याच्या दिशेने योग्य समयी टाकली गेलेली पावले, नियमांतील शिथिलता, उद्योगधंद्यांना उत्पादिताशी संलग्न प्रोत्साहन (पीएआय) योजना आणि यासारखे अनेक धाडसी आर्थिक सुधारणांसंबंधी सरकारने दाखविलेली आस्था याचे सकारात्मक प्रतिबिंब अर्थव्यवस्थेत उमटलेले दिसून येत आहेत, असे या सर्वेक्षणातील आशावादाला अधोरेखित करताना सीआयआयचे अध्यक्ष टी. व्ही. नरेंद्रन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

कंपन्यांच्या प्रमुखांनी चालू आर्थिक वर्षातील कंपन्यांची महसुली स्थितीही उत्तम राहण्याचे अनुमान व्यक्त केले आहे. कोविडपूर्व (२०१९-२०) परिस्थितीच्या तुलनेत चालू वर्षात महसुलात १० ते २० टक्क्यांची वाढ संभवण्याचे अनुमान ३५ टक्के मुख्याधिकाऱ्यांचे आहे. ३३ टक्के मुख्याधिकाऱ्यांनी यापेक्षा खूप अधिक (२० टक्क्यांहून मोठी) महसुली वाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

नवीन ओमायक्रॉनच्या संसर्गासंबंधाने चिंता करावी अशी सध्या स्थिती नसली तरी त्याचा उद्रेक झाल्यास, त्याचा सर्वाधिक जाच हा सेवा क्षेत्राला सोसावा लागेल, असे मत ५५ टक्के मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्या उलट संभाव्य लाटेच्या परिणामी निर्मिती क्षेत्रदेखील प्रभावित होऊ शकेल, असे मत ३४ टक्के कंपन्यांच्या प्रमुखांना वाटते असे हे सर्वेक्षण सांगते.

The post दोन अंकी विकासदराचे कयास; चालू आर्थिक वर्षासंबंधी कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांचा आशावाद appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3yHgiUw
via

No comments:

Post Bottom Ad

Pages