राज्यात ओमायक्रॉनचे ११ नवे रुग्ण - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 21, 2021

राज्यात ओमायक्रॉनचे ११ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे ११ नवीन रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत या रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक पाच हे मुंबईतील आहेत.

मुंबई विमानतळावरील प्रवाशांच्या सर्वेक्षणात आठ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याचा अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिला आहे. यातील प्रत्येकी एक रुग्ण ठाणे, केरळ व गुजरातमधील असून उर्वरित पाचजण मुंबईतील आहेत. यापैकी दोन जण युगांडा (मार्गे दुबई), दोन जण दुबई व चार जण ब्रिटनमधून आलेले आहेत. त्यात दोन मुले १८ वर्षांखालील असल्याने ते वगळता इतरांचे लसीकरण झालेले आहे. हे सर्वजण सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे विरहित आहेत. उस्मानाबादमधील ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाची १३ वर्षांची मुलगीही  बाधित असल्याचे आढळून आले असून तिला कोणतीही लक्षणे नाहीत. केनियाहून हैद्राबादमार्गे नवी मुंबईत आलेला तरुण ओमायक्रॉनबाधित असून त्याचे लसीकरण झाले आहे व त्याला कोणतीही लक्षणे नाहीत.

करोनाचे ८२५ रुग्ण

राज्यात दिवसभरात करोनाच्या ८२५ रुग्णांचे निदान झाले असून, १४ जणांचा मृत्यू झाला.  दिवसभरात ७९२ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ७१११ इतकी झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत मुंबई  ३१२, ठाणे जिल्हा ७६, नाशिक जिल्हा ४७, अहमदनगर ५०, पुणे जिल्हा २०६  नवीन रुग्णांची नोंद झाली.

The post राज्यात ओमायक्रॉनचे ११ नवे रुग्ण appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mmuihi
via

No comments:

Post Bottom Ad

Pages