रेल्वेमार्गावरील पाणीगळती रोखण्यात यश - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 14, 2021

रेल्वेमार्गावरील पाणीगळती रोखण्यात यश

लाखो लिटर पाण्याचा अपव्यय टळला

मुंबई : मुंबई उपनगरीय हार्बर रेल्वेमार्गावरील गुरू तेग बहादूर सिंग (जी.टी.बी.) नगर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाखालून जाणाऱ्या ६०० मिलिमीटर  जलवाहिनीवरील मोठी गळती वेळीच रोखण्याचे अत्यंत आव्हानात्मक काम महानगरपालिकेने पार पाडले. विशेष म्हणजे रेल्वेमार्ग सुरू असतानाच, रेल्वे वाहतुकीला कोणताही अडसर होऊ न देता जमिनीखाली सुमारे १२ फूट खोलीवर हे काम पूर्ण करण्यात आले. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाण्यापासून वाचले, त्यासोबत रेल्वे रुळाखाली भूस्खलन होण्यासारखा संभाव्य धोकादेखील टळला.

मुंबई उपनगरीय रेल्वेअंतर्गत हार्बर मार्गावरील गुरू तेग बहादूर सिंग (जी.टी.बी.) नगर रेल्वे स्थानकाजवळून शीव सर्कल येथे जाणाऱ्या पादचारी पुलाजवळ, रेल्वे रुळाखालून जाणाऱ्या जलवाहिनीवर गळती होत असल्याचा संदेश जल अभियंता विभागअंतर्गत वरळी स्थित ‘साहाय्यक अभियंता, जलकामे, तातडीचा दुरुस्ती विभाग’ यांना मिळाला. हे काम अत्यंत जोखमीचे तसेच तातडीने करणे आवश्यक होते. या गळतीचे स्थान नाला व रेल्वे रूळ यामध्ये होते.

जेसीबी अथवा कोणत्याही संयंत्राच्या साहाय्याने तेथे खोदकाम केल्यास रुळाखाली भूस्खलन होऊन रुळाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. रेल्वेची वाहतूक सुरू असताना जमिनीस हादरे बसतात. त्यामुळे ६०० मिलिमीटर आकाराच्या जलवाहिनीत उतरून दुरुस्ती करणे अवघड होते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन तसेच रेल्वे प्रशासनाची परवानगी घेऊन ७ ते १३ डिसेंबर २०२१ या कालावधीत, रेल्वे रुळास व रेल्वे वाहतुकीस बाधा येणार नाही, अशा रीतीने प्रत्यक्ष दुरुस्ती सुरू करण्यात आली.  गळती अन्वेषण विभागाने खोदकाम करून गळती शोधण्यास सुरुवात केली. त्या वेळी जलवाहिनी सापडत नसल्याने खोल खड्डा खोदावा लागला. जमिनीखाली सुमारे १२ फूट खोल जलवाहिनी आढळली, तेव्हा जलवाहिनीवर सिमेंट कोबा असल्याचे निदर्शनास आले. हा कोबा फोडून जलवाहिनीवरील चौकोनी गाबडा गॅस कटरने कापण्यात आला.

मात्र, जलवाहिनीत पाणी असल्याने व आजूबाजूची माती व दगड खड्डयात जात असल्याने शोरिंग प्लेट्स चारही बाजूंनी लावून खड्डा सुरक्षित करून जलवाहिनीवर मॅनहोल लावण्यात आला. त्याद्वारे सीसीटीव्ही कॅमेरा आत टाकून निरीक्षण केले असता सुमारे ३ मीटर अंतरावर म्हणजेच जवळजवळ रुळाखालीच गळती आढळली.  या गळतीच्या ठिकाणी लाकडी खुंटय़ा व पाचर अरुंद जागेत बसवून कौशल्यपूर्णरीत्या गळती पूर्णपणे बंद करण्यात आली.

The post रेल्वेमार्गावरील पाणीगळती रोखण्यात यश appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3pU5HkZ
via

No comments:

Post Bottom Ad

Pages