आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले मुंबईत दाखल
मुंबई : नंदुरबार येथे आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांचे मुंबईत आगमन झाले आहे. अवघ्या महिन्याचे असलेल्या या बछड्यांना आईचे दूध न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती; मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आसरा मिळाल्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती सुधारू लागली आहे.
नंदुरबार वनविभागाच्या तळोदा परिक्षेत्रात ३० नोव्हेंबरला बिबट्याचे दोन बछडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडले. १ व २ डिसेंबरला बछड्यांची त्यांच्या आईशी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. आईचे दूध मिळत नसल्याने त्यांची प्रकृती खालावत होती. त्यामुळे दोन्ही बछड्यांना मुंबईतील राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात आले. राष्ट्रीय उद्यानात ३ डिसेंबरला दाखल झालेल्या बछड्यांपैकी एकाचे वजन ८७० ग्रॅम आणि दुसऱ्याचे वजन ९६० ग्रॅम होते.
सध्या राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांच्या दवाखान्यात एक विशेष कक्ष तयार करून येथे या दोन्ही बछड्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी २४ तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या विशेष कक्षात वातानुकूलन यंत्र आणि हीटरची व्यवस्था असल्याने तापमान नियंत्रित करता येते. तसेच त्यांना सकाळी दोन तास सूर्यप्रकाशातही ठेवण्यात जाते. ‘पेटलॅक’ हे अमेरिकी औषध बिबट्यांसाठी आईच्या दुधासारखे काम करते. त्यामुळे एकावेळी २० एमएल असे दिवसातून सहा वेळा दोन्ही बछड्यांना हे औषध देण्यात येत आहे. आता त्यांचे वजन १२०० ग्रॅमपर्यंत वाढले आहे.
The post अनाथ बछड्यांना राष्ट्रीय उद्यानात आश्रय;आईपासून दुरावलेली बिबट्याची पिल्ले मुंबईत दाखल appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3dP64aP
via
No comments:
Post a Comment