बैलगाडा शर्यतीस परवानगीचा आदेश जारी - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 21, 2021

बैलगाडा शर्यतीस परवानगीचा आदेश जारी

मुंबई :  बैलांना उत्तेजक द्रव्य पाजण्यास तसेच काठीने मारण्यास मज्जाव, बैलगाडीत केवळ एकच व्यक्ती बसेल आणि संपूर्ण शर्यतीचे आयोजकांनी चित्रीकरण करण्याच्या अटींवर राज्यात उद्यापासून बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास राज्य सरकारने मंगळवारी परवानगी दिली. या नियमांचा भंग झाल्यास गाडीमालक किंवा आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मुभाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

 उच्च न्यायालयाच्या बंदीमुळे राज्यात गेल्या सात वर्षांपासून बैलगाडी शर्यंत बंद होती. या प्रकरणी शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. गेल्याच आठवड्यात न्यायालयाने बैलगाडी शर्यतीस सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्याच्या राज्य सरकारने जुलै २०१७ मध्ये मंजूर केलेल्या अधिनियमातील नियमांचे काटेकोरपणे पालन करून बैलगाडी शर्यत आयोजनास पशुसंवर्धन मंत्रालयाने परवानगी दिली असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

The post बैलगाडा शर्यतीस परवानगीचा आदेश जारी appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3qjmRbQ
via

No comments:

Post Bottom Ad

Pages