मुंबई पोर्ट ट्रस्टच्या निर्णयावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब
मुंबई : करोना प्रतिबंधक लशीची एकही मात्रा न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दर दहा दिवसांनंतर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक करणारा मुंबई पोर्ट ट्रस्टचा निर्णय उच्च न्यायालयाने मंगळवारी योग्य ठरवला. तसेच नागरिक जाणूनबुजून करोनावरील लस घेणे टाळून स्वत:चे आरोग्य धोक्यात घालत आहेत आणि करोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही वाढवत आहेत, अशी टिप्पणीही केली.
दर दहा दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्याच्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जून महिन्यातील निर्णयाला लस न घेतलेल्या सात कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने मात्र हा निर्णय योग्य ठरवला. लस न घेण्याच्या याचिकाकर्त्यांच्या निर्णय स्वातंत्र्याचा आदर केला जायला हवा. परंतु पोर्ट ट्रस्टकडून लसवंत कर्मचाऱ्यांना जशी वागणूक दिली जाते त्यासाठी लस न घेतलेले कर्मचारीही पात्र आहेत किंवा तो त्यांचा अधिकार आहे असा त्याचा अर्थ नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
The post लस न घेणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर बंधनकारक; मुंबई पोर्ट ट्रस्टच्या निर्णयावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3yQ6Luw
via
No comments:
Post a Comment