नवाब मलिक यांचा विधान परिषदेत सवाल
मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या शपथपत्रात तीन कोटी ४२ लाख रुपयांचे उत्पन्न जाहीर करणारे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहकारी बँकेच्या निवडणुकीत ‘मजूर’ कसे, असा सवाल अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी विधान परिषदेत केला.
सभागृहात निवडून येण्यासाठी शपथेवर एक सांगायचे आणि सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या निवडणुकीत मजूर असल्याचा दावा करायचा, हा ‘फर्जीवाडा’ असल्याची टीका मलिक यांनी केली.
मलिक यांनी विशेष उल्लेखाच्या माध्यमातून विधान परिषदेत दरेकर यांच्या निवडणुकीसंदर्भातील मुद्दे उपस्थित केले. दरेकर यांनी २०१६ मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या शपथपत्रात त्यांचे उत्पन्न तीन कोटी ४२ लाख रुपये दाखविले असताना दुसऱ्या निवडणुकीत त्यांनी मजूर असल्याचा दावा केला आहे. हा गुन्हा असल्याचे मलिक यांनी सभागृहात सांगितले.
त्यावर याप्रकरणी अल्पकालीन चर्चा घ्यावी. मजूर, शेतकरी या संज्ञा स्पष्ट करण्याची गरज असून मलाही या मुद्दय़ांवर बोलायचे आहे, असे दरेकर यांनी नमूद केले. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी याप्रकरणी सहकार खात्याकडून चौकशी सुरू असल्याचे नमूद केले. तेव्हा दरेकर यांनी उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितला असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तेव्हा चौकशीचा अहवाल आल्यावर याप्रकरणी सभागृहात अल्पकालीन चर्चा घेतली जाईल, असे सभापतींनी स्पष्ट केले.
The post कोटय़वधींची मालमत्ता जाहीर करणारे दरेकर ‘मजूर’ कसे?; नवाब मलिक यांचा विधान परिषदेत सवाल appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3pmTgzm
via
No comments:
Post a Comment