मुंबई: राज्यात यंदा जून ते आक्टोबर दरम्यान१०७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी ४८२ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या ही आपत्ती मानून त्यांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासंदर्भातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कुणाल पाटील, समीर कुमावत आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नापिकी बँका किंवा मान्यताप्राप्त सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे होणारा कर्जबाजारीपणा व ते कर्ज परतफेडीचा तगादा या तीन कारणांमुळे एकाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्याच्या कुटुंबीयांनी एक लाखाची मदत दिली जाते. मात्र ही मदत तुटपुंजी असल्याने त्यात वाढ करण्याचे विचाराधीन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांसाटी लाभदायी ठरणाऱ्या स्मार्ट योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. शेतकऱ्यांना देण्यात येणारे गट शेती थकित अनुदान याबाबत ही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
The post आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखांच्या मदतीचा प्रस्ताव विचाराधीन appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/32rGS81
via
No comments:
Post a Comment