उपनगरातील भूमि अभिलेख विभागातील १०२ नकाशे संशयास्पद; प्रतिबंधित क्षेत्रात जुने बांधकाम दाखवून नियमित करण्याचा प्रयत्न - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 25, 2021

उपनगरातील भूमि अभिलेख विभागातील १०२ नकाशे संशयास्पद; प्रतिबंधित क्षेत्रात जुने बांधकाम दाखवून नियमित करण्याचा प्रयत्न

प्रतिबंधित क्षेत्रात जुने बांधकाम दाखवून नियमित करण्याचा प्रयत्न

मुंबई :  उपनगरातील प्रतिबंधित क्षेत्रात जुने बांधकाम दाखवून ते नियमित करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमि अभिलेख विभागातील १०२ नकाशांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

भूमि अभिलेख विभागाकडे त्यांच्या अखत्यारितील परिसराचे अधिकृत नकाशे असतात. नुकतीच भूमि अभिलेख विभागाकडून उपनगरातील ८८४ नकाशांची तपासणी करण्यात आली. त्यातील १०२ नकाशे संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले. भूमि अभिलेख विभागाकडील अधिकृत माहिती व या नकाशांमधील माहिती यात तफावत आढळून आली. परंतु हे संशयास्पद बदल कोणी केले, याबाबत कोणतीही कागदोपत्री माहिती नसल्यामुळे अखेर याप्रकरणी खेरवाडी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार खेरवाडी पोलिसांनी अनोळखी कर्मचारी, व्यक्तीविरोधात भादंवि कलम ४२० (फसवणूक), ४६५ (बनावट कागदपत्र तयार करणे), ४६७ (बनावट कागदपत्रे), ४०९ (विश्वासघात करणे), ३४ (सामाईक इराद्याने गैरकृत्य करणे) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

घोटाळा काय?

एकूण ८८४ नकांशापैकी १०२ नकाशे बनावट असून त्यावर जुने बांधकाम दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे ना विकसित क्षेत्र, सागरी किनारपट्टी नियंत्रण नियमावली विभागातील (सीआयझेड) बांधकामे नियमित करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी आता खेरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. हे बनावट नकाशे नेमके कोणी व कधी तयार केले त्याची कागदोपत्री माहिती असती, तर संबंधित व्यक्तीवर विभागीय कारवाई करणे शक्य झाले असते. पण तसे पुरावे नसल्यामुळे  याप्रकरणी भूमि अभिलेख विभागाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आल्याचे सूत्रांनी सांगितले.

The post उपनगरातील भूमि अभिलेख विभागातील १०२ नकाशे संशयास्पद; प्रतिबंधित क्षेत्रात जुने बांधकाम दाखवून नियमित करण्याचा प्रयत्न appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3elV5pI
via

No comments:

Post Bottom Ad

Pages