शाळांबाबत तूर्त काहीच निर्णय नाही; तिसरी लाट ओमायक्रॉनची; राजेश टोपे यांचा इशारा - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 25, 2021

शाळांबाबत तूर्त काहीच निर्णय नाही; तिसरी लाट ओमायक्रॉनची; राजेश टोपे यांचा इशारा

तिसरी लाट ओमायक्रॉनची; राजेश टोपे यांचा इशारा

मुंबई : राज्यात करोनाची तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनची असेल हा धोका ओळखूनच गर्दी टाळण्यासाठीचे निर्बंध लागू करण्यात  आले आहेत. करोना रुग्णांवरील उपचारासाठी दररोज ८०० टन प्राणवायूची गरज पडू लागल्यास टाळेंबदी लागू करण्याचा निकष आहे. मात्र ओमायक्रॉनच्या फैलावाचा वेग जास्त असल्याने हा निकष बदलून ५०० टन प्राणवायूचा वापर सुरू झाल्यावर टाळेबंदी लावावी लागेल अशी वेळ येऊ शकते, असा इशारा सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. निर्बंध कठोर करण्यात आले असले तरी शाळांबाबत तूर्त तरी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही व तसा विचारही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात शनिवारपासून नवीन निर्बंध लागू झाले असून रात्रीची जमावबंदी आणि कार्यक्रमांसाठी उपस्थितीचे निकषही बदलले.  या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गर्दी टाळून ओमायक्रॉनचा धोका टाळण्याचे आवाहन टोपे यांनी केले. ओमायक्रॉनमुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याबाबत टोपे यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात काही दिवसांपूर्वी रोज करोनाचे सरासरी ७०० रुग्ण सापडत होते. आता ही रुग्णसंख्या १४०० पर्यंत वाढली आहे.  ओमायक्रॉनबाधितांची संख्या १००वर गेली. .आता ही संख्या कमी वाटत असली तरी ओमायक्रॉनबाधितांची संख्या एक हजार झाल्यावर परिस्थिती कठीण होईल. कारण ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग खूप आहे. परदेशात एका दिवसात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. क्षेत्रफळाच्यादृष्टीने महाराष्ट्राच्या निम्मा असलेल्या फ्रान्समध्ये दिवसाला ओमायक्रॉनचे एक लाख रुग्ण आढळत आहेत. आपल्याकडेही आता ओमायक्रॉनचे बऱ्यापैकी रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे करोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉनची असेल, असे टोपे यांनी नमूद केले.

The post शाळांबाबत तूर्त काहीच निर्णय नाही; तिसरी लाट ओमायक्रॉनची; राजेश टोपे यांचा इशारा appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mxsoui
via

No comments:

Post Bottom Ad

Pages