मुंबई : ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय पुन्हा होईपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकार सोमवारी विधिमंडळात ठराव मांडणार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी सांगितले.
शास्त्रीय सांख्यिकी तपशील (इंपिरिकल डाटा) उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सुरू ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी महापालिकांसह अन्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणार आहेत. राज्यघटनेतील तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या निवडणुका नियोजित वेळी घेण्याची राज्य निवडणूक आयोगाची भूमिका आहे.
शास्त्रीय सांख्यिकी तपशील तयार करण्यास राज्य मागासवर्ग आयोगाला काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ओबीसींना न्याय देण्यासाठी तोपर्यंत निवडणुका लांबणीवर टाकण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी भाजपचीही भूमिका असल्याने हा ठराव विधिमंडळात एकमताने मंजूर होणे अपेक्षित आहे.
The post स्थानिक निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबत आज ठराव appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3EyJu1c
via
No comments:
Post a Comment