आरेतील रस्त्याच्या काँक्रीटीकरणावर पर्यावरणवाद्यांचा आक्षेप - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 15, 2021

आरेतील रस्त्याच्या काँक्रीटीकरणावर पर्यावरणवाद्यांचा आक्षेप

मुंबई : आरेतील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या पालिकेच्या निर्णयावर पर्यावरण कार्यकत्र्यांनी आक्षेप घेतला आहे. काँक्रीटचा रस्ता कमी काळ टिकतो. तसेच हा रस्ता झाल्यानंतर येथे वाहतूक वाढेल व त्याचे दुष्परिणाम वनसंपदेवर होतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

आरेमध्ये प्रवेश करण्यासाठीचा मुख्य रस्ता ६ किमी लांबीचा आहे. हा रस्ता २००७ सालापर्यंत काँक्रीटचा होता; मात्र तो टिकाऊ नसल्याच्या कारणास्तव त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मग आता पुन्हा काँक्रीटीकरण केल्यास रस्ता टिकेल का, असा प्रश्न ‘आरे वाचवा चळवळी’तील कार्यकर्ते, स्थापत्य अभियंता बिजू अगस्ती यांनी उपस्थित केला. काँक्रीटीकरण करण्यासाठी जेवढा पैसा खर्च केला जाणार आहे त्याच्या एक चतुर्थांश रकमेत या रस्त्याचे डांबरीकरण केले जाऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.

आरेतील या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार होते; मात्र पर्यावरण कार्यकत्र्यांच्या विरोधानंतर रुंदीकरणाचा निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे अनम्ेक झाडे बाधित होण्यापासून वाचली. त्यानंतर या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे ठरले. काम सुरू झाल्यानंतर येथे येणाऱ्या मोठमोठय़ा यंत्रांमुळे भोवतालची झाडे बाधित होण्याची भीती पर्यावरण कार्यकत्र्यांना वाटत आहे. रस्त्याची एक बाजू बंद राहिल्यामुळे दुसऱ्या बाजूला वाहतूक कोंडी होऊन प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढण्याची भीती कार्यकत्र्यांनी व्यक्त केली.

The post आरेतील रस्त्याच्या काँक्रीटीकरणावर पर्यावरणवाद्यांचा आक्षेप appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3dQZIbc
via

No comments:

Post Bottom Ad

Pages